सहकारी संस्था या केवळ वित्त पुरवठादार नाहीत तर त्यांचा बहुआयामी सहभाग सुनिश्चित केला पाहिजे :- दीपक पटवर्धन

रत्नागिरी :
प्राथमिक कृषी संस्थांच्या व्यावसायिक विकासासाठी योजना या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी समोर बोलताना.
पॅक्स ग्रामिण अर्थकारणाचा कणा
सहकारी प्राथमिक संस्था या आजही ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहेत.
बदलत्या जगा मध्ये केवळ जुन्या शैलीत काम न करता बहुआयामी काम प्राथमिक कृषी संस्थानी केल पाहिजे.
बदल स्वीकारून मार्गक्रमण
बदलत तंत्रज्ञान, बदलती बाजारपेठ ,प्रचंड स्पर्धा, बदलते वातावरण अश्या अनेक बदलांना सामावून सहकारी संस्थानी मार्गक्रमण करायला हवे यातच सहकारी संस्थांची यशोगाथा दडलेली आहे. असे परखड मत दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले . पुणे स्थीत वैकुंठभाई मेहता इंस्टिट्यूट मधील आंतरराष्ट्रीय केंद्रात नेपाळ . म्यानमार,बांगलादेश, झांबिया गाबिया. आणि भारत देशातील निमंत्रित प्रतिनिधींसमोर बोलताना पटवर्धन यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अंब्रेला टाईप सहकार विकास आणि त्यातून वाढलेली अर्थकारणाची गती त्याभागातील विकास या विषयावर अनेक संदर्भ देत तिथल्या पॅक्स सोसायट्यांची यशोगाथा वर्णन केली.
स्वरूपानंद पत संस्थेने केलेली भरीव भांडवल निर्मिती चा प्रवास आणि त्यात मिळालेल यश. ६३% ते ० % NPA करताना केलेले प्रयत्न या बाबत ऊहापोह केला.
सहकारातून समृद्धी हा दृष्टीकोन वास्तवात आणुया
सहकारातून समृद्धी हा पंतप्रधानांनी दिलेला दृष्टीकोन अमलात आणण्यासाठी युवा वर्गाचा सहभाग आणि सहकारी संस्थानी करावयाचे बदल यावर ही अनेक उदाहरणे देत भाष्य केले.
आंतरराष्ट्रीय आयोजनात वक्ता म्हणून सहकारी संस्थांची यशोगाथ मांडताना खूप आनंद घेता आला उपस्थित प्रतिनिधीनी विचारलेल्या शंका चे निरसन करता आले यातून खूप समाधान मिळाले. अश्या आयोजनात मिळालेली संधी ही माझ्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीची पावती आहे अस मला वाटत अशी प्रतिक्रिया प्रतिनिधीन समोर पटवर्धन यांनी व्यक्त केली.