पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संस्था अभिसरण अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
सांवतवाडी :
पी आर आय सीबीओ कन्वर्जन्स (Pri CBO Converges) प्रकल्पांतर्गत माजगाव येथील सावली ग्रामसंघ व जागृती ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांमध्ये अभ्यासातील एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढावी या उद्देशाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही ग्रामसंघांच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक बालसभेचे प्रतिनिधी आणि ग्रामसखींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे आयोजन सावली ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. श्वेता माजगावकर, कोषाध्यक्षा सौ. श्रेया कासार, सचिव सौ. रूपाली तारी, जागृती ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. प्रतीक्षा पवार, सचिव सपना गावडे, लिपिका सौ. रोशनी निब्रे तसेच ग्रामसखी स्नेहा साळगावकर, माया साळगावकर, प्रांजल शेटकर, एलआरपी पूर्वा गावडे व एफएलसीआरपी माधवी भोगण यांच्या पुढाकाराने करण्यात आले. याप्रसंगी शिवशक्ती बालसभेचे अध्यक्ष सार्थक लक्ष्मण कासार आणि सचिव स्वरा राजेश गावडे हेदेखील उपस्थित होते.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील एकाग्रता वाढीस लागावी, यासाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रम या प्रसंगी राबविण्यात आले. ग्रामसंघांच्या या संयुक्त पुढाकाराचे आणि बालसभेच्या सहभागाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.













