वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ अन् घरकुलात उजळला ‘आशिर्वादाचा दिवा’
माडखोल । लखन आडेलकर :
ग्रामपंचायत कारिवडे येथे ‘सेवा संकल्प अभियान’, जलसंधारण उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे नुकतेच अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि संभाव्य पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याच्या कामाचा शानदार शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच जलतारा कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. प्रमोद कामत, पंचायत समिती सभापती श्रीम. सुश्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्री. मायकल डिसोजा, सावंतवाडीचे गटविकास अधिकारी मा. श्री. निलेश जाधव, सौ. प्राजक्ता केळुसकर, श्री. शरद धाउसकर, श्री. जितेंद्र गांवकर, सौ. प्रणाली टिळवे, सौ. उत्कर्षा गांवकर, सरपंच सौ. आरती माळकर आणि उपसरपंच श्री. महेश गावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रतिभा जाधव, श्री. नितिन गावडे, उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक श्री. भिडे सर, भैरववाडीच्या पोलिस पाटील सौ. श्रुती गोसावी, कारिवडेचे पोलिस पाटील श्री. प्रदिप केळुसकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. शंकर मेस्त्री, माजी सरपंच श्री. तानाजी साईल, श्री. अशोक माळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय सावंत, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.संदिप माळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष बिले, विस्तार अधिकारी श्री. प्रशांत राणे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. अंकुश जंगले, विस्तार अधिकारी श्री. एकनाथ सावंत, विस्तार अधिकारी श्री. वैभव सावंत, मनरेगा एपीओ श्रीम. संजिवनी चव्हाण, मनरेगा टी.ओ. श्रीम. नम्रता परब, कृषी सेवक शुभम सरोळकर आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. भरत बुंदे यांचीही विशेष उपस्थिती होती.
’सेवा संकल्प अभियाना’चा भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी लाभार्थ्यांच्या नवीन घरात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आशिर्वादाचा दिवा’ लावून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधण्यात आला.
अभियानादरम्यान पेडवेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ ला भेट देऊन तेथील शैक्षणिक सुविधांची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पाणी टंचाई’ या ज्वलंत विषयावर अत्यंत प्रभावी व प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
या मोहिमेत सी.आर.पी. सौ. हर्षदा कारिवडेकर, सी.आर.पी. सौ. शारदा बोभाटे, ग्रामसंघातील सर्व महिला, महिला बचत गटांच्या पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी उपस्थित होते. संपूर्ण कारिवडे गावाने एकत्र येत हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.














