आ. किरण सामंत यांच्या आवाहनास शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेरळ शाखेच्या वतीने विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचा शुभारंभ

लांजा ( प्रतिनिधी) आमदार किरण सामंत यांनी‌ बंधारे बांधण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शाखा वेरळच्यावतीने बंधारी बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला.

सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे आवाहन आमदार किरण सामंत यनी शिवसैनिकांना केले होते.

या आवाहनास लांजा तालुक्यातील शिवसैनिक व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे.वेरळ शिवसेना शाखेच्या वतीने विविध बंधारे बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, सभापती मानसी आंबेकर,जि.प. सदस्य मनिषा राखण, पं. स. सदस्य दिपाली साळवी, ग्रा. प. सदस्य शरद चरकरी, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच इक्बाल टोळे, वेरळ शाखा प्रमुख सीताराम पातेरे, उपशाखा प्रमुख दिपक खामकर, शामसुंदर पाताडे, महिला शाखा संघटिका स्मिता खामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण तसेच सर्व मान्यवर व शाखा संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.