कोटकामते मंदिरातील भक्तनिवासाचे उद्घाटन; जनरेटरचे लोकार्पण
देवगड : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील कोटकामते येथील इनामदार श्री देवी भगवती संस्थान मंदिराला भेट देऊन श्री देवी भगवतीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भक्तनिवासाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जनरेटरचे लोकार्पण देखील करण्यात आले.
यावेळी गुरु घाडी, बाळा खडपे, संतोष किंजवडेकर, सावी लोके, सभापती अनुराधा नारकर, सरचिटणीस संदीप साटम, बंड्या नारकर, राजा भुजबळ, वैभव करंगुटकर, भूषण पोकळे, महेश जंगले, राकेश खाजनवाडकर, सभापती गणेश राणे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरुल, शरद ठुकरुल, इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामते मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर मुकुल प्रभू देसाई आदी उपस्थित होते.













