देवगड तालुक्यातील देवगड गुजराती नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी विधिवत पूजा करून देवीची आरती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटीदार समाजाची कित्येक वर्षापासूनची अत्यंत महत्वाची व जिव्हाळ्याची मागणी माझ्या पाठपुराव्यामुळे यशस्वीरीत्या पूर्ण केली. ट्रेन क्र. १६३३५ व १६३३६ गांधीधाम-नागरकोईल एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा मंजूर करून दिल्याबद्दल देवगड गुजराती नवरात्र मंडळ व समस्त पाटीदार समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी संदीप साटम, मंडलअध्यक्ष बंड्या नारकर, बाळा खडपे, दया पाटील, वैभव करंगुटकर, देवगड गुजराती नवरात्र मंडळ अध्यक्ष कांतिभाई पटेल उपाध्यक्ष हरिभाई पटेल ज्येष्ठ विठ्ठलभाई पटेल, प्रेमजीभाई पटेल, नानजीभाई पटेल, गोविंदभाई पटेल, विठ्ठलभाई, मोहनभाई, विनोदभाई, जीतूभाई अमितभाई लहेरीकांत भावेश मनीष वसंत आणि इतर मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.













