राजापूर भाजपाच्या वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
राजापूर (प्रतिनिधी): भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे रविवारी राजापूरात येत असून यावेळी त्यांच्या हस्ते भाजपाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौवर होणार आहे.दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी राणे यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
या विद्यार्थी गुणगौरव समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांसह भाजपा लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजापूर विधानसभा संयोजक दिपक पटवर्धन भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे.राजापूर तालुका पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात रविवारी 27 रोजी सकाळी 10.30 वाजता हा गुणगौरव समारंभ होणार आहे. यावेळी तालुक्यात दहावी, बारावी कला, विज्ञान व वाणिज्य तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुका सरचिटणीस मोहन घुमे यांनी केले आहे.











