मच्छी वाहतूक करणारा ट्रक आंजणारी पुल येथे पलटी, मच्छीचे नुकसान

ट्रक चालक किरकोळ जखमी

लांजा (प्रतिनिधी): दापोलीहून गोव्याच्या दिशेने मच्छी घेऊन जाणारा ट्रक मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी
पुल येथे पलटी झाला. यामध्ये मच्छीचे नुकसान झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दापोली येथून मच्छी घेऊन गोव्याकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम एच ०८ डब्ल्यू ४६८६ ) मुंबई गोवा महामार्गावर
आंजणारी पूल येथे पलटी झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रक चालक सुदीप दुबे (वय २५, उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला. मात्र अपघातामध्ये मच्छीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातामध्ये जखमी चालकावर पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.