भाजपचे भरत लाड हडी उपसरपंचपदी विजयी

Google search engine
Google search engine

शिवसेना ठाकरे गटाचा पराभव ; ६ विरुद्ध ३ मताधिक्याने लाड यांचा विजय

मालवण | प्रतिनिधी : हडी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत भाजप पुरस्कृत भरत लाड यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राची मयेकर यांचा ६ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे ऋषिकेश आसवलकर हे अनुपस्थित होते. दरम्यान ऋषिकेश यांच्या अनुपस्थितीचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला. असे सांगत माजी सरपंच महेश मांजरेकर यांनी ऋषिकेश यांचे आभार मानले आहेत.

हडी ग्रामपंचायत येथे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या सभेत उपसरपंच निवडणूक ग्रामसेवक अंबादास पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी सरपंच, उपसरपंच यांसह सदस्य आंनद रावले, सायली मिठबावकर, प्रज्ञा सुर्वे, सुहासिनी वाळवे, प्राची मयेकर, दीक्षा गावकर, भावेश सुर्वे आदी उपस्थित होते.

माजी सरपंच महेश मांजरेकर, दिनेश सुर्वे, शिवराम गावकर, उमेश हडकर, सिद्धार्थ तोंडवळकर, निलेश नारिंगरेकर, राजकुमार शेडगे, मंगेश सुर्वे, अमोल गावकर, सचिन लाड, प्रतीक तोंडवळकर, सुधाकर वाळवे, सागर पोयरेकर, अभय गावकर, सागर दांडकर, आलम शेख, सलीम शेख यासह अन्य उपस्थितांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.