निफ थ्रोइंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातून तीन खेळाडू रवाना

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या स्पोर्ट्स निफ थ्रोइंग क्रीडाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा रशिया येथे २ ते ६ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून जागतिक संघटनेच्या आमंत्रणावरून रत्नागिरी जिल्ह्यातील तीन खेळाडू रशियाला रवाना झाले आहेत.
डॉ करणकुमार कर्रा, भरत कर्रा, शादाब अडरेकर हे तिघे तेथील स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षण व परीक्षेसाठी सहभाग घेणार आहेत. भारतातून या क्रीडाप्रकारासाठी जिल्ह्यातून तिघांचा सहभाग भविष्यात या क्रीडाप्रकाराची सुरवात जिल्ह्यातून देशभरात होईल असे दिसून येत आहे. फिजिओथेरपी मधील एम. डी. असलेले डॉ. करण, यश इंग्लिश अकॅडमी क्रीडा शिक्षक भरत करा यांचे चिपळूणच्या अनेक क्रीडाप्रेमिनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.