चिपळूण तालुका कबड्डी निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

ओम ॲकॅडमीचे आयोजन

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने किशोर-किशोरी निवड चाचणी स्पर्धा रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी ओम स्पोर्ट ॲकॅडमी, कोलेखाजण येथे उत्साहात पार पडली. अध्यक्ष मंगेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष एल. के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले होते.
यात किशोरी गटात ६ तर किशोर गटात २२ संघ होते. किशोरी गटात प्रथम- स्वराज्य स्पोर्ट्स ‘अ’, द्वितीय- स्वराज्य ‘ब’, तृतीय- श्रद्धा स्पोर्ट्स कापसाळ, चतुर्थ- कादवड क्रीडा मंडळ. किशोर गट: प्रथम- संघर्ष चिपळूण, द्वितीय- देऊळवाडी ओवळी, तृतीय- महाकाली कुंभार्ली, चतुर्थ- साई स्पोर्ट्स खेर्डी. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यवाह विलास गुजर, उपाध्यक्ष स्वप्निल शिंदे, खजिनदार भूषण कुलकर्णी, ओम अकॅडमीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष शिर्के, पंच ऋषिकेश ढगळे, विलास सुतार, प्रशांत सकपाळ व सर्व पंचांनी परिश्रम घेतले. दरम्यान, ११ वेळा महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक असलेल्या संतोष शिर्के यांच्या ओम स्पोर्ट्स अकॅडमी मिरजोळी कोलेखाजन या ठिकाणी सर्व वयोगटांसाठी कबड्डी प्रशिक्षण सुरू असून, मूलभूत तंत्र, फिटनेस व स्पर्धात्मक प्रशिक्षण दिले जाते.