एक देठ, दोन फुले… निसर्गाची अनोखी किमया!

गंडभेरुंडाचे शरीर एक आणि मुखे दोन… तर जास्वंदीचा देठ एक आणि फुले दोन!

निसर्गाच्या अद्भुत कल्पकतेची ही दोन वेगवेगळी रूपे पाहताना मन थक्क होते. गंडभेरुंडाच्या रूपात सामर्थ्याची कल्पना, तर जास्वंदीच्या या अनोख्या रचनेत सौंदर्याची अनुभूती!

एकाच देठातून उमललेली ही दोन लाल फुले म्हणजे निसर्गाने सहजतेने घडवलेली एक सुंदर कलाकृतीच!

निसर्गाला कल्पनाशक्तीची ना सीमा असते, ना चौकट… तो कधी एकातून दोन घडवतो, तर कधी दोनांतून एकत्वाचा सुंदर संदेश देतो!
धनंजय मराठे
राजापूर