आता ग्रामीण भागात सुद्धा,पसरलेल्या दुष्ट आणि हुकूमशाही प्रवृत्ती,अरेरावी आणि भ्रष्टाचाराच्या नरकासुराचे फोंडाघाट मध्ये धिंड काढून दहन !

फोंडाघाटचे शिल्पकार विनय कुशे   यांच्या क्रिएटिव्हिटीचे सर्वत्र कौतुक ! बाजारपेठ मित्र मंडळाचे नियोजन !

फोंडाघाट : नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला “बाजारपेठ मित्र मंडळ” यांच्या माध्यमातून नरकासुराच्या प्रतिमेची फोंडाघाट एसटी स्टँड बाजारपेठ मार्गावर ट्रॉली मधून वाजत गाजत धिंड काढण्यात आली. नरकासुराच्या प्रतिमेची निर्मिती फोंडाघाटचे शिल्पकार विनय कुशे यांच्या अभ्यासपूर्ण कामगिरीतून झाली. राक्षसीवृत्ती, दृष्टता, खोटेपणा ,निर्दयीपणा, अरेरावी, कठोरता, निष्ठुरता, उग्रपणा या नरकासुराच्या स्वभावगुण विशेषासह पुतळा भितीदायक, हिंस्र हुकूमशाहा ,अत्याचारी या रंगरेषा हुबेहूब साकारल्या होत्या. स्पॉटलाईट आणि उग्र संगीतामुळे वातावरणातील भयानकता अधिक जाणवत होती. युवाईने नरकासुराच्या निषेध घोषणांनी बाजारपेठ दुमदुमली.अखेर पहाटे बोंबा मारून नरकासुराचे आणि त्याच्या दुष्प्रवृत्तीचे दहन करण्यात आले. आजच्या युवाई ने समाजातील दुष्प्रवृत्ती, हुकूमशाही, अरेरावी आणि हम करे सो कायदाss याच्या विरोधात काम करण्याची तयारी यावेळी बोलून दाखवली. मंडळाच्या या उपक्रमा मुळे पेठेमध्ये कौतुक होत होते…