लांजा (प्रतिनिधी) : विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे मुख्य रस्त्यापासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची नुकतीच श्रमदानाने डागडुजी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विलवडे मुख्य रस्ता ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता अनेक खड्ड्याने व रानाने वेढलेला होता. रेल्वे स्थानक प्रवाशांना जा ये करताना व तेथे येणाऱ्या वाहनाना याचा त्रास होत होता. त्यामुळे रिक्षा संघटनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रमदानातून खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. त्याबद्दल विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना व परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त करून रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, हा रस्ता सिमेंट काँक्रीट चा व्हावा
तसेच त्याची रुंदी वाढवण्यात यावी असे निवेदन विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेतर्फे आमदार किरण सामंत यांना देण्यात आले आहे.
Home महत्वाच्या बातम्या विलवडे मुख्य रस्त्यापासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी विलवडे रेल्वे स्थानक...












