वराडकर हायस्कूल सह कट्टा पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव
चौके l प्रतिनिधी:-मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज कट्टाचा इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गौरांग गणेश वाईरकर याची कबड्डी स्पर्धेच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी 2026 साठी निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक , विजयश्री देसाई व सर्व संचालक, विश्वस्त, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. त्याची मेहनत व जिद्द तसेच त्याला प्रशालेतील शिक्षकांचे मिळणारे योग्य मार्गदर्शन त्यामुळे हे यश तो प्राप्त करू शकला. संस्थेला व प्रशालेला त्याचा अभिमान असून त्याच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना संस्था पदाधिकारी व प्रशालेचे शिक्षक यांनी व्यक्त केली असून कांता पंचवटी कट्टा पंचक प्रसिद्ध गौरांग वाईरकर याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे













