मारुती मंदिर येथे एका तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील मारुती मंदिर येथील श्रीनाथ डेअरीमध्ये तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना शुक्रवार 23 डिसेंबर रोजी रात्री 1.30 वा.सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शंकरलाल पेमाराम डांगी (23,मुळ रा.उदयपूर राजस्थान सध्या रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याचा साडू रमेश लखाजी डांगी (42,मुळ रा.उदयपूर राजस्थान सध्या रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानूसार,शुक्रवारी शंकरलाल जेवण करुन रात्री 12.15 वा.झोपी गेला होता.रात्री 1.30 वा.सुमारास त्याची पत्नी तुलसी हिला जाग आली असता तिला शंकरलाल गळफास घेतलेल्यास अवस्थेत दिसून आला.याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल कोकरे करत आहेत.