खेडमधील लवेल येथे कंपनीच्या गोडावूनसमोरून ३,८०० मीटर कंडक्टर वायर चोरीला

रत्नागिरी: 

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लवेली येथे ‘लीना पॉवरटेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या गोडावूनसमोरून कंडक्टर वायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. दिलेल्या अहवालानुसार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या कालावधीत ही घटना घडली असून, याप्रकरणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ३३ मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंपनीच्या गोडावूनसमोरील मोकळ्या आवारात लाकडी ड्रममध्ये ठेवलेली एकूण ३८०० मीटर लांबीची (AAAC २३२ mm2 डायमीटर) जुनी वापरती कंडक्टर वायर अज्ञात चोरट्याने परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादी अखिलेशकुमार श्रीलालताप्रसाद प्रजापती (वय ४८, रा. सध्या हनुमानपेठ, चिखले अपार्टमेंट, गांधीचौक, ता. खेड, जि. रत्नागिरी; मूळ/सध्या विरार ईस्ट, जि. पालघर) यांनी तक्रार दिली असून, अज्ञात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.