वेंगुर्ले पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्यातर्फे अणसुर ग्रामपंचायतीचा सन्मान…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याने केले अभिनंदन

वेंगुर्ले : प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अणसुर ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल वेंगुर्ले पंचायत समितीच्यावतीने सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते सरपंच सत्यविजय गावडे यांच्यासह ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी अणसूर गावात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन ही पार पडले.

या प्रसंगी वेंगुर्ला शहर प्रमुख (शिवसेना) अजित राऊळ, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, द्रौपती नाईक, सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे आणि संयमी गावडे उपस्थित होते.

तसेच सी.आर.पी. शीला देऊलकर, शिक्षक बाबुराव माळगावकर, ग्रामपंचायत कर्मचारी सोनू गावडे, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, अंगणवाडी मदतनीस अन्नपूर्णा गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, कृषी सखी दिशा गावडे, पशु सखी विनया गावडे यांसह ग्रामस्थ वैशाली गावडे, भूमी गावडे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अणसुर ग्रामपंचायतीने गावात सार्वजनिक शौचालय उभारले या कामामुळे गावातील नागरिक, प्रवासी व महिलांची मोठी सोय होणार असून स्वच्छतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी गावातील स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी ग्रामपंचायत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सार्वजनिक मालमत्तेचे जतन करण्याचे आवाहन केले.