
ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावात पुनः एकदा ओमकार ची एन्ट्री झाली मात्र मागच्या वेळेपेक्षा यावेळी मात्र ओमकार थोडासा आक्रमक दिसला.मागच्या वेळेस वस्तीमधून,भर रस्त्यावरून जाताना त्याने कशाचेही नुकसान केले नव्हते ओटवणे मंदिराकडून सरळ ओटवणे पुलापर्यंत व्यवस्थित आलेल्या ओमकार ने मागे फिरून कापईवाडी गाठली आणि कापईवाडी येथिल रमेश वरेकर यांच्या अंगणतील चार चाकी टाटा नॅनो,प्लेजर दुचाकीला धक्का देत नुकसान केले.त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मांडवफातर वाडी येथे वळवीला व बाळकृष्ण भगत यांच्या पाण्याच्या टाकीची तोडफोड तसेच चारचाकी वाहनाचे नुकसान तसेच भातपीकाचेही नुकसान केले.गेल्या 15 दिवसापूर्वी हत्ती आला त्यावेळी गावातील मांडवफातरवाडी येथिल उद्योजक सुरेश वरेकर यांच्या बागेतून गेला त्यानंतर त्यांच्या घराशेजारील नळाचे पाणी पिऊन पुढे निघाला पण चुकूनही त्या नळाची तोडफोड केली नाही, बागायतीचच सुद्धा नुकसान केले नाही. रवळनाथ मंदिराकडून सरळ गेला पण मंदिराकडील दुकानात ठेवलेल्या केळीच्या एका घडाला सुद्धा त्याने तोंड लावल नव्हतं यावेळी मात्र तो थोडासा आक्रमक दिसला गावातील शेतकऱ्यांच्या पोफळीचेही नुकसान केले.ओटवणे मार्गे दोडामार्ग ला नेण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येत होता मात्र मधेच ओंकार ने आक्रमक रूप धारण केले आणि तो मागारी परतला रात्री उशिरा पर्यंत त्याचा ओटवणेतच मुक्काम होता.













