गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील, माखजन बाजारपेठ येथे खाडीलगत संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे या कामी चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून ४ कोटी इतकी रक्कम मंजूर झाली आहे.
या कामाचा शुभारंभ २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता,आमदार शेखर निकम यांच्या शुभ हस्ते होणार आहे.यावेळी जि.प.सदस्य सुशील भायजे,पं.स.सदस्य प्रिया सुवरे,महेश जड्यार,माखजन चे सरपंच महेश बाष्टे,आदिंसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन देखील माखजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.












