जॅकवेल कोसळल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली असताना विरोधी पक्ष आक्रमक

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी जावून केली पाहणी 

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शिळ धरणावरचे जॅकवेल कोसळून शहरात पाणीबाणी निर्माण झाली असताना आता विरोधी पक्ष आक्रमक झाला असून नागरिकांना ऐन गणेशोत्सवात होणार्या त्रासाला विरोधी पक्षाकडून वाचा फोडली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन नळ पाणी योजनेच्या चौकशीची मागणी केली आहेच. त्याचवेळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांनी शिळ जॅकवेल ची पहाणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी पाणी सभापती बबन आंबेकर, शहर उपाध्यक्ष सानिफ गव्हाणकर, युवक शहराध्यक्ष मंदार नैकर उपस्थित होते होते.