रोटरी क्लब, रत्नागिरी मिडटाऊन, रोटरेक्ट क्लब, रत्नागिरी, पर्यावरण संस्था यांच्यावतीने भाट्ये रत्नागिरी येथे निर्माल्य संकलन

रत्नागिरी :  रोटरी क्लब, रत्नागिरी मिडटाऊन, रोटरेक्ट क्लब, रत्नागिरी आणि पर्यावरण संस्था रत्नगिरी यांचे संयुक्त विद्यमाने भाट्ये रत्नागिरी येथे निर्माल्य संकलन करण्यात आले. सुमारे १.२५ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. त्यातील प्लास्टिक अजैविक घटक आणि फुलोरा वेग वेगळा करून करून निर्माल्य पोमेंडी येथील नर्सरीमध्ये खत तयार करण्याकरिता पाठविण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब रत्नागिरी मिड टाऊनचे अध्यक्ष श्री. बिपीन गांधी, रोटरेक्ट क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष श्री आर्य विनय आंबुलकर आणि पर्यावरण संस्था रत्नगिरीचे सदस्य डॉ. केतन चौधरी यांनी निर्माल्य संकलन कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी रोटरी परिवारातील सर्व कुटुंब सदस्य हजर होते. श्री दिगंबर मगदूम यांनी निर्माल्य वाहतूकीसाठी गाडी पुरवली. पर्यावरण सेवा म्हणजेच गणपती सेवा असे मानून रोटरी मिड टाउन परिवारातील सर्व महिला, मुले-मुली यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी डॉ नटराज पवार, शाल्मली आंबुलकर, श्री संजीव सुर्वे, डॉ वामन सावंत, डॉ. संजीव पाटोळे, क्लब सेक्रेटरी डॉ स्वप्ना करे, डॉ संदीप करे, श्री. ईश्वर आगाशे यांनी कुटुंबासह प्रत्यक्ष सहभाग घेतला. भाटये गावचे माजी सरपंच श्री भाटकर यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. यावेळचे वैशिष्ठ म्हणजे सर्व भाविक स्वत:हून निर्माल्य आणून देत होते. दि २५ सप्टेबर अनंत चतुर्दशी दिवशी सुद्धा निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे.