सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शोधाला पेटंट

 

अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवलीचे प्राचार्य डॉ. अनीश चिंतामण गांगल व मेकॅनिकल विभागाचे प्रा. कल्पेश सुनिल कांबळे यांनी “रेट्रॅक्टबल व्हर्टिकल अक्सिस विंड टरबाईन” या उपकरणाच्या पेटंटची भारत सरकारकडे नोंद केली होती त्यास मंजुरी मिळून सरकारकडून त्यांना पेटंट मिळाले व याचा शोधनिबंध देखील आँफिशिअल जर्नल आँफ पेटंट आँफीस इंडिया मध्ये प्रसिद्ध झाला आहे.या पेटंटचा भविष्यात अक्षय ऊर्जेसाठी उपयोग होणार असून त्याबाबतचे पेटंट मिळणे ही संस्थेसाठी व महाविद्यालयासाठी गौरवाची बाब असल्याची भावना महाविद्यालयाच्या अध्यक्षा सन्मा. सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे, अँडमिनिस्ट्रेटीव्ह आँफीसर श्री. शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.