रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित ,पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला कै.सौ.विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना )गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय ,श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी होणारा कै.नाना गांधी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विनायक हातखंबकर उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक मनोज जाधव , कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका सौ .वर्षा जोशी, सौ. प्राजक्ता कुळकर्णी, सौ .वृंदाली गुरव ,सौ मानसी चव्हाण, वृषाली घाणेकर, शुभांगी शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व कै.नानांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्याध्यापकांच्या हस्ते मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज जाधव यांनी केले. प्रास्ताविकेमध्ये ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नेहमी प्रगती साधली पाहिजे. नानांनी मुलांसाठी विविध उपक्रम राबविले होते .नाना नेहमीच कार्यमग्न असत. कै.नानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग दर्शविला याचा मला आनंद आहे .स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सानिका संजय गावडे व रिद्धी नागवेकर यांनी स्पर्धेसंबंधी आपले मनोगत व्यक्त केले व मनोगतातून स्पर्धेचे आयोजक शशांक गांधी यांचे या स्पर्धेसाठी आभार व्यक्त केले.
शिक्षकांमधून सौ .वर्षा जोशी यांनी कै.नानांच्या स्मृतींना उजाळा देताना नानांच्या कार्यकर्तृत्वाची महती विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली .यानंतर कै.नाना गांधी स्मृती- प्रीत्यर्थ आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सौ वृषाली घाणेकर यांनी निकाल जाहीर करताना बक्षीसपात्र सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेतून प्रथम- रिद्धी प्रेमनाथ नागवेकर (बारावी कला )द्वितीय – आसिया ईरशाद अत्तरवाले (बारावी कला) तृतीय -श्रावणी प्रवीण धनावडे (अकरावी कला) उत्तेजनार्थ क्रमांक -जिया चंद्रकांत कोकरे (अकरावी कला ), शर्वरी संजय बोंबले (अकरावी कला) तर वाणिज्य शाखेमधून प्रथम -श्रावणी विक्रांत साळवी (बारावी वाणिज्य -ब)व द्वितीय -दिलकश जहीर जिवाजी (बारावी वाणिज्य- ब ),तृतीय-रेशम सुभाष पोमेंडकर( बारावी वाणिज्य -अ),उत्तेजनार्थ सानिका संजय गावडे( अकरावी वाणिज्य -अ), शिवानी रमेश पाटील (अकरावी वाणिज्य -ब)तर विज्ञान शाखेतून प्रथम- साक्षी समीर फोंडेकर (बारावी विज्ञान )द्वितीय सेजल अजित चव्हाण (बारावी विज्ञान) तृतीय- समृद्धी सुरज बोरकर (अकरावी विज्ञान) उत्तेजनार्थ साक्षी विश्वनाथ महाडिक .(बारावी विज्ञान) शर्वरी संजय आग्रे (अकरावी विज्ञान) यांनी क्रमांक पटकाविले .निबंध स्पर्धेसाठी माझ्या मते, समान नागरी हक्काची आवश्यकता ,माझे आदर्श व विज्ञान क्षेत्रात माझे योगदान असे तीन विषय देण्यात आले होते . सदर स्पर्धेचे परीक्षण सौ. प्राजक्ता मयुरेश कुळकर्णी ,सौ वृंदाली राजेंद्र गुरव व सौ. मानसी मंगेश चव्हाण यांनी केले कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून लाभलेले भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विनायक हातखंबकर आपल्या मनोगतातून म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी नेहमीच विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन यशप्राप्ती मिळवली पाहिजे व प्रत्येक मदतीसाठी सर्वांबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. भावी पिढी सुजाण ,सुसंस्कृत व सुदृढ घडली पाहिजे.” कार्यक्रमाचे आयोजक व कै.सौ.विजयालक्ष्मी (गोदूताई)श्रीकृष्ण(नाना)गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे देणगीदार शशांक गांधी यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या व सर्व स्पर्धक, यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले .अध्यक्षीय मनोगतात राजेंद्र कांबळे म्हणाले, “नानांचे नेतृत्त्व, कर्तृत्त्व,दातृत्त्व अफाट होते.ते गोरगरिबांचे कैवारी होते .विविध खेळांना प्राधान्य देणारे होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नानांची कामगिरी भरीव होती .नाना आयुष्यभर इतरांसाठी झटले म्हणूनच आज नाना रत्नागिरीवासीयांच्या हृदयात वास करतात” .कै.नाना गांधी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला .बक्षीसाचे स्वरूप प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असल्याने मुलांनाही पुढील वर्षी स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळाली. उपस्थितांचे आभार सौ. शुभांगी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले व आभार मानण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मानसी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी दत्ता मांजरेकर ,कल्पना नागवेकर, दीपिका कुळकर्णी, तानाजी वाघमारे ,सौ शीतल रोकडे आदी शिक्षक- वृंद उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे व पर्यवेक्षक.मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कै. नाना गांधी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.











