तळवली प्रीमिअर लीग पर्व 2 चा श्री सिद्धिविनायक संघ विजेता

मास्टर शशिकांत संघ उपविजेता

तळवली | वार्ताहर : आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या गेलेल्या तळवली प्रीमिअर लीग पर्व 2 चा श्री सिद्धिविनायक संघ विजेता ठरला तर मास्टर शशिकांत संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तालुक्यातील तळवली डावलवाडी येथील मैदानावर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण 10 संघमालकांच्या 10 संघांनी सहभाग घेतला होता.यामध्ये मनोज आंब्रे यांचा खुशी इलेव्हन, गिरिराज व प्रसाद कारेकर यांचा मास्टर शशिकांत, अमित पोफळे व स्वप्नील शिगवण यांचा स्वयंभू सोमनागेश्वर, रोहित व वैभव शिगवण यांचा जय भवानी क्रिकेट संघ,मंदार पवार यांचा तनिष वारिअर्स,विशाल सांगळे व कैलास आग्रे यांचा फोरेव्हर शाहू, शैलेश डाकवे व सुरज खोकरे यांचा श्री सुकाईदेवी वारिअर्स,प्रदीप चव्हाण यांचा श्री सिद्धिविनायक संघ,विश्वदीप व वरुण यांचा भूमी इलेव्हन व टीपीएल पर्व 2 क्रिकेट संघ या संघाचा समावेश होता.

स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच अनंत डावल यांच्या शुभहस्ते गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेला विविध स्तरातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम 10000/- तर उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम 7000/- देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.मालिकाविर म्हणून अभिषेक डावल,उकृष्ट फलंदाज अविनाश आग्रे,उत्कृष्ट गोलंदाज प्रदीप चव्हाण यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कॅप अभिषेक डावल याने व उत्कृष्ट गोलंदाज कॅप प्रथमेश पोफळे याने पटकावली.स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी गावातील विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेत पंच म्हणून सुदीप जाधव,समित पवार,विनोद पवार,प्रवीण पवार,अभिषेक डावल, प्रदीप चव्हाण, संदीप चव्हाण यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे समालोचन नरेश पवार,ओंकार पिंपळकर व समर्थ कळंबाटे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी तळवली प्रीमिअर लीगच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.सदर स्पर्धा युट्यूब लाईव्ह दाखवण्यासाठी कौशिक कोळवणकर,अजय सावंत व सागर कांबळे यांनी मेहनत घेतली तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी चहा व जेवण व्यवस्था डावलवाडी महिलांनी अतिशय उत्तमरीत्या केली