माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी निलेश राणे
विरोधकांना धडकी भरेल अशी लाट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे महाविजयाचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प तडीस नेण्यास आम्ही सर्वजण समर्थ आहोत. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मिळवूनच आम्ही स्वस्त बसू,तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शांत राहणार नाही. जनतेशी सातत्याने संपर्क करेल.आज जसे तुम्ही कार्यकर्ते जागरूक आहात तसेच कायम जागरूक राहा. कणकवली विधानसभेचा विजय निश्चितच आहेच मात्र सावंतवाडी आणि कुडाळ मालवण या दोन्ही मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून खऱ्या अर्थाने महा विजय 2024 साजरा करूया असे आवाहन माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी निलेश राणे यांनी केले.