वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी यांची निवड

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी व व्हाईस चेअरमनपदी प्रज्ञा परब यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निबंधक उमिला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह संघाच्या सर्व संचालक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.