ना. नारायण राणे यांचाही विशेष प्रयत्न
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चे चेअरमन राजन नानचे यांनी, वंचित शेतकऱ्यांना खावटी पूरक कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी सहकार मंत्री अतुलजी सावे यांना देण्यासाठी निवेदन भाजपा नेते राजन तेली यांचेकडे सुपूर्त केले.
शासनाने यापूर्वी शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेमध्ये खावटी पूरक शेती कर्जाचा समावेश केला नसल्यामुळे बहुसंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. या योजनेमध्ये गावठी पूरक कर्जाचा समावेश करून लाभ देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून शासन दरबारी निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.ज्याप्रमाणे नियमित भरणा करणाऱ्या कर्जदारांना वीस हजार पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात आले व थकबाकीदारांचे दीड लाख पर्यंत सर्व कर्ज माफ करण्यात आले, त्याप्रमाणे खावटी पूरक कर्जमाफी अथवा अनुदान तसेच जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रयत्न करावे, अशी विनंतीवजा शेतकऱ्यांची अपेक्षा निवेदनातून राजन नानचे यांनी मंत्री महोदयांना केली आहे…