सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहाचे औचित्य साधून महिलांकरीता मालवण शहर मर्यादित ऑनलाईन (फोटो) तुळस सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मागील वर्षी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने आयोजित तुळस सजावट स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेत विजेत्या तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून या व्यतिरिक्त अन्य स्पर्धकांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार आहेत. तुळस सजावट स्पर्धेत रांगोळी व पणत्या असणे आवश्यक असून रांगोळी व तुळस सजावट नीटनिटके असावेत. स्पर्धकाने आपल्या सजवलेल्या तुळस व रांगोळी याचा फोटो नाव व पत्त्यासहित 9209333012 किंवा 7588564887 या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावेत. २४ नोव्हेंबर सायं. ६.३० वाजेपर्यंत आलेले फोटो स्पर्धेत सहभागी केले जातील. परीक्षकांनी पसंती दिलेल्या पहिल्या १० स्पर्धकांच्या घरी भेट दिली जाईल. तरी या स्पर्धेत मालवण शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.











