खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील चिंचघर गावची सुकन्या आंतरराष्ट्रीय व आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेती तथा शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी स्नेहल शिंदे यांचा सत्कार २४ रोजी खेड तालुका कबड्डी असोसिएशन, स्वामी समर्थ सेवा मंडळ खेड व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्यावतीने शिवतर रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर शेजारील मैदानात सकाळी ८ वाजता करण्यात आला.
खेडमधील मूळ रहिवासी असलेल्या अंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्नेहल शिंदे यांचा जाहीर सत्कार खेडमधील विविध संस्थांच्यावतीने . २४ रोजी शिवतर रोड येथे करण्यात आला. स्नेहल शिंदे यांचे वडील नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन श्री शिंदे यांचा यावेळी रोहन विचारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष सतीश चिकणे यांचा देखील लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कबड्डीप्रेमी राजेश बुटाला, स्वप्नील सैतावडेकर, संदीप सासने, श्री बैकर, डॉ. विक्रांत पाटील, तुषार सापटे, चिकणे, भोसले, संपदा गुजराथी, अमोल दळवी आदी उपस्थित होते. महिला व पुरुष गटातील जिल्हास्तरीय कबड्डीपटू देखील यावेळी उपस्थिती होते.











