स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण संस्थांचे कार्य मोलाचे

Google search engine
Google search engine

माजी आमदार सदानंद चव्हाण

माखजन | वार्ताहर : स्वातंत्र्य पूर्व काळात शिक्षण संस्था सुरु करणं आणी त्या त्या रित्या चालवणं हे आज एवढं सोप नव्हतं.पारतंत्र्यात ज्या ज्या ठिकाणी शिक्षण संस्था उभ्या राहिल्या त्या त्या ठिकाणी प्रगती होत गेली.त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण संस्थांचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वर चे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केले.ते सरंद येथे माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकोत्तर द्वितीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

श्री चव्हाण पुढे म्हणाले की १०० वर्षांपूर्वी कोणतीही भौतिक सोयी सुविधा नसताना शिक्षण संस्था चालवणे जिकिरीचे होते.शाळा चालू झाली म्हणून ग्रामीण जनतेला शिक्षण मिळालं.अन्यथा अशिक्षितांची संख्या वाढत गेली असतील.परंतु ज्यांनी गरज ओळखून ही संस्था उभी केली,त्या सगळ्या महानुभवाना श्री चव्हाण यांनी वंदन केले.यावेळी बेलारी हायस्कुल चे मुख्याध्यापक व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी चे संचालक श्री प्रकाश पांढरे सरांनी मार्गदर्शन केले.

माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचा शतकोत्तर द्वितीय वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला.गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी,संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदजी साठे होते.शशिकांतजी वैश्यंपायन,विनायकजी नामजोशी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान पारितोषिक वितरण सोहळा झाला.वर्षभरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शालेय कर्माचारी श्री नानासाहेब ठोंबरे,श्री सचिन साठे,श्री निखिल वारके,श्री जयंत साळवी,श्री गौरव पोंक्षे आदीना सन्मानपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंदजी साठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कै.गो.बा.नातू यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन केले.कार्यक्रमाला सचिव राजेशजी फणसे,परागजी लघाटे,सतीशजी साठे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक खजिनदार संदेशजी पोंक्षे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी मानले.व सूत्रसंचालन गौरव पोंक्षे याने केले.