चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘५१व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास ३ जानेवारीपासून सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रारंभ होणार आहे. हे प्रदर्शन ५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये ३ रोजी सकाळी ९ वाजता विज्ञान दिंडीचे उद्घाटन गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत असणार आहेत. तसेच खासदार विनायक राऊत, सुनील तटकरे, आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, राजन साळवी, योगेश कदम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे उपस्थितीत राहणार आहेत. दुपारी १ ते ५ यावेळेत प्रतिकृती परीक्षण तसेच पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. ४ रोजी सकाळी ११ वा. विज्ञान शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग होणार असून सेवासाधना प्रतिष्ठान केतकी- सचिव विनित वाघे व्याख्याते असणार आहेत. दुपारी १ वा. विज्ञानाचा अद्भूत प्रवास या विषयावर प्रश्न मंजूषा स्पर्धा होणार आहे. ५ रोजी दुपारी २ वाजता पारितोषिक वितरण होणार असून समारंभाचे अध्यक्ष आमदार शेखर निकम असणार आहेत.
तसेच कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सावर्डे फार्मसी कॉलजेच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन पूजा निकम, तहसीलदार प्रवीण लोकरे, सावर्डे सरपंच समिक्षा बागवे, शांताराम खानविलकर, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सुनिता शिरभाते, जि.प. माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गोपाळ चौधरी, चिपळूण गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, जि.प. प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, राजेंद्रकुमार वारे उपस्थित राहणार आहेत.











