आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत पुरस्कार स्विकारताना विशेष आनंद! बालकलाकार रुची नेरुरकर

Google search engine
Google search engine

बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने सन्मानित

मसुरे | झुंजार पेडणेकर : लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका श्रीमती सुधाताई करमरकर स्मृती प्रीतर्थ बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने कुडाळ- नेरूर येथील रुची संजय नेरुरकर हिला आंगणेवाडी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.  सोनी मराठी वाहिनी वरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील बाल कलाकार रुची संजय नेरुरकर हि काम करत आहे. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, बाल नाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे, मंडळ प्रमुख कार्यवाह मधुकर आंगणे, छोटू आंगणे, काका आंगणे, प्रसाद मंगेश आंगणे, बाबू आंगणे, संजय नेरुरकर, चिन्मया ठाकूर,

निलेश गुरव, रुपेश नेवगी

संजना नेरुरकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गची गुणी बाल कलाकार म्हणून रुची नेरुरकर हिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंगणे कुटुंबियांच्या शुभेच्छा नेहमीच तिच्या पाठीशी असतील असे प्रतिपादन यावेळी मधुकर आंगणे यांनी केले. रुची नेरुरकर हिने पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानत आंगणेवाडीच्या पुण्य भूमीत सदर पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी आनंद आंगणे, बाळा आंगणे,  सतीश आंगणे, दत्ता आंगणे, अनंत आंगणे, निशिकांत आंगणे,  राजन आंगणे, शशी आंगणे, नंदू आंगणे, सुनील आंगणे, सुधा आंगणे, प्रसाद  आंगणे, समीर आंगणे, बाब्या आंगणे, रघुनाथ आंगणे, पंकज आंगणे, प्रसाद मंगेश आंगणे, संकेत आंगणे, जयेश आंगणे, महेश आंगणे, आबा आंगणे, विजय चव्हाण, बंडू चव्हाण, तनुराज आंगणे, कुणाल आंगणे, देवेंद्र आंगणे, जितेंद्र आंगणे, जयेश आंगणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध कला दिग्दर्शक रुपेश नेवगी, बाल कलाकार चिन्मया ठाकूर यांचा आंगणे कुटुंबीयांच्या वतीने सत्कार  करण्यात आला. आभार बाबू आंगणे यांनी मानले.