उंबर्डे येथे 18 व 19 रोजी राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील संघ होणार सहभागी

वैभववाडी : प्रतिनिधी
उंबर्डे येथे ग्रामसेवा क्रीडा मंडळामार्फत भव्य राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी 2023 रोजी उंबर्डे येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील नामांकित संघ, राज्याबाहेरील चार यामध्ये दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील संघही भाग घेणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 35 हजार रुपये व भव्य चषक तर द्वितीय उपविजेत्या संघाला 30 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकासाठी 20 हजार रुपये व भव्य चषक व चौथ्या येणाऱ्या संघास 15 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील पाच ते आठ क्रमांकापर्यंत प्रत्येकी पाच हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेटमन, उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट लिप्टर, आदर्श संघ यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरची शूटिंग बॉल स्पर्धा ही राष्ट्रीय स्तरावरील असून एका वैभववाडी सारख्या छोट्या गावात होत आहे. या स्पर्धेसाठी होणारा खर्च हा मोठा असून दानशूर व्यक्तींनी यासाठी मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष एस एम बोबडे व सचिव विजय पांचाळ यांनी केले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील संघानी सहभाग घ्यावा. असे आवाहन अॕड.महेश रावराणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9421144741, 9421144781 या नंबरवरती संपर्क साधावा.