वैभववाडी येथे भाजपा भटके विमुक्त आघाडीची बैठक संपन्न
वैभववाडी l प्रतिनिधी : उबाठाचे खा. विनायक राऊत यांनी गावागावातील धनगरवस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करणे, व मलिदा लाटणे एवढे एकमेव काम राऊत यांचे राहीले आहे. अशी टीका सिंधुदुर्ग भाजपा भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नवलराज काळे यांनी केली आहे.
वैभववाडी भाजपा पक्ष कार्यालयात तालुक्यातील भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती मोहिते, तालुका अध्यक्ष गंगाराम अडुळकर, गंगाराम शिंदे, राधिका शेळके, रुक्मिणी शेळके, सुरेश बोडके, रवींद्र भागवत, अनिल कोकरे, शामराव शेळके, दाजी बर्गे, नवलु झोरे, मनोहर बोडेकर, विजय बोडेकर, उत्तम निकम, दीपक गजोबर, संतोष निकम, सदाशिव माने, नगरसेविका सुंदरी निकम, व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवलराज काळे म्हणाले, उबाठा गटाचे कार्यकर्ते आता निवडणुकीपुरता आपली दुकाने सुरू करत आहेत. निवडणुका झाल्या की त्यांची दुकाने परत बंद होतील. उबाठा पक्षात राहण्यापेक्षा धनगर बांधवांनी भाजपात सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे यांनी कित्येक कुटुंबे उभी केली आहेत. अशा नेतृत्वाच्या पाठीशी समाज बांधवांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. महायुतीचा उमेदवार हा तीन लाख मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.












