लांजा तालुक्यातील एक कोटी २० लाख रुपयांची विकास कामे मंजूर

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून ही कामे मंजूर

भाजपाचे लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर यांची माहिती

लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील १ कोटी २० लाख रुपयांची विकास कामे मंजूर झाले असल्याची माहिती भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष महेश खामकर यांनी पत्रकारांना दिली.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून तसेच ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद जठार आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या प्रयत्नाने ही कामे मंजूर झाली आहेत. २५/१५ मधून मंजूर झालेल्या या विकास कामांमध्ये उपळे जावडे, झापडे, देवधे, वेरवली, भांबेड, आरगाव या गावांचा समावेश आहे. विकास कामांना अशाप्रकारे भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.
मंजूर झालेल्या या विकास कामांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक बनवून तसेच तांत्रिक मंजुरी घेऊन लवकरच या सर्व कामांचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भूमिपूजन केले जाणार आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यापुढेही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापेक्षाही अधिक निधी आणला जाणार आहे. लांजा तालुक्यातील विकास कामांना गती मिळाली आहे. भविष्यात तालुक्यातील असंख्य विकास कामे मार्गी लावुन तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी दिली.