दापोली | प्रतिनिधी : दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या शिवधनुष्य युवा महोत्सव या स्पर्धेत श्रद्धा पराडकर व हार्दिक घाग यांनी जेथे पद पटकावले
यावेळी घेण्यात आलेल्या समुहनृत्य स्पर्धेत
प्रथम क्र . कलारत्न ग्रुप चिपळूण
द्वितीय क्र. स्टेपर्स डान्स ग्रुप चिपळूण
तृतीय क्र . इवोल्यूशन डान्स ग्रुप चिपळूण
उत्तेजनार्थ . शुक्रतारा कलामंच दापोली यांनी पटकावला.
तर एकेरीनृत्य स्पर्धा
प्रथम क्र . शुभम रसाळ , रत्नागिरी
द्वितीय क्र . निशा जाधव, खेड
तृतीय क्र . अंकिता गुरव , दापोली
उत्तेजनार्थ . अश्विनी शिरस्वाल , दापोली यांनी पटकावला.
अत्यन्त अटीतटीच्या झालेल्या सौंदर्य स्पर्धा
मिस शिवधनुष्य . श्रद्धा पराडकर रत्नागिरी
मिस्टर शिवधनुष्य . हर्दिक घाग चिपळूण यांनी नाव कोरले.
यावेळी दापोली तालुक्यात निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच, पद्मश्रीने सन्मानित भि. रा. तथा दादा ईदाते तसेच माजी आमदार सदानंद कदम नगरसेविका कृपा घाग, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर यांचा सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे या ठिकाणी दापोली तालुका मल्लखांब संघटनेचे मल्लखाम्ब प्रात्यक्षिक देखील पार पडले त्याचप्रमाणे ज्ञानदीप विद्यामंदिर चा पोवाडयाने सर्वांची मने जिंकली तसेच क्रीडा प्रकारात नेत्र दीपक कामगिरी करणारे विद्यार्थी व नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले.
दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लगत असणाऱ्या मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या वेळी यावेळी आमदार योगेश कदम उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर भगवान घाडगे तालुकाप्रमुख उन्मेष राजे महिला आघाडी प्रमुख दीप्ती निखार्गे शहर अध्यक्ष पप्पू रेळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेने मोठ्या संख्येने उपस्थित होते