विजेचा शॉक लागून ४५ वर्षे व्यक्तीचा मृत्यू, कुवे मावळतवाडी येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) विजेचा जोरदार शॉक लागून ४५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील कुवे मावळतवाडी येथे गुरुवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची खबर मुलगा अजिंक्य प्रकाश नेमण( वय २४ वर्षे राहणार कुवे मावळतवाडी) यांने लांजा पोलिसांना दिली. घटनेमध्ये कुवे मावळतवाडी येथील प्रकाश शाम नेम (वय ४६ राहणार कुवेत) हे गुरुवार दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नवीन घराचे काम चालू असल्याने, जुन्या घराचा लाईटचा मीटर काढून दुसऱ्या जागी बसवलेल्या लाईटचे बोर्वडवरून लाईट गेल्याने नवीन घराच्या बोर्डातून वायर टाकून लाईट घेत असताना गेलेले लाईट अचानक आली आणि प्रकाश नेमण यांना जोरदार शॉक बसला .आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या दुर्दैवी मृत्युने कुवे मावळतवाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे .या घटने प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.