रत्नागिरी : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रत्नागिरी या समिती कार्यक्षेत्रातील इयत्ता १२ वी शास्त्र प्रवेशित व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता सन २०२३-२४ या वर्षात JEE, NEET, MH-CET या राज्य सामाईक प्रवेश परिक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
तरी JEE, NEET, MH-CET या परिक्षांच्या निकालानंतर जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये व विद्यार्थ्यांची आयत्यावेळी होणारी धावपळ वाचेल यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी आपले अर्ज विनाविलंब दाखल करावेत. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट (हार्ड कॉपी) व सर्व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी
या समिती कार्यालयात त्वरीत दाखल करावी असे समिती कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.