खेड (प्रतिनिधी)गणेशोत्सव कालावधीत ६ गणपती स्पेशल गाड्यांच्या १६६ फेऱ्या धावणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या गाड्यांचे आरक्षण २१ जुलैपासून सकाळी ८ वाजता खुले होणार आहे. तसेच दिवा-चिपळूण मेमू अनारक्षित सपेशलच्या ३६ फेऱ्याही दिमतीला आहेत.
यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण यापूर्वीच फुल्ल झाले आहे. यामुळे असंख्य प्रवासी प्रतीक्षा यादीवर आहेत. प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर दिलासाच दिला आहे. १ सप्टेंबरपासून गणेशोत्सवात सीएसएमटी मुंबई- सावंतवाडी, सीएसएमटी-रत्नागिरीसह एलटीटी-कुडाळ गणपती स्पेशलच्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या ६ गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षणही खुले होणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत.












