आंबवलीत झोलाई क्रीडामंडळातर्फे तालुकास्तर कबड्डी स्पर्धा, २५ हून अधिक संघांचा सहभाग, आंबवलीचा झोलाई संघ तृतीय
खेड(प्रतिनिधी) तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुक्यातील आयवती- देऊळवाडी येथील श्री झोलाई क्रीडामंडळाच्या वतीने श्री झोलाई मातेच्या शिमगोत्सवानिमित्त आयोजित तालुकास्तरीय
खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत मडगावच्या श्रीकृष्ण फायटर्सने तर ६० किलो वजनी गटातील स्पर्धेत चाकाळच्या महालक्ष्मी प्रतिष्ठानने विजेतेपद पटकावले. खुल्या गटात अष्टविनायक संघ उपविजेता, आंबवलीच्या झोलाई युवा प्रतिष्ठानला तृतीय तर खेडच्या जय गणेश क्रीडा मंडळाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ६६६६ रुपये, ४४४४ रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास २२२२ रूपये व चषक देवून गौरवण्यात आले. उत्कृष्ट चढाई अष्टविनायकचा दुर्वेश चव्हाण, उत्कृष्ट पकड विशाल सोंदरे, सर्वोत्कृष्ट खेळाडू ओंकार सौंदरे यांना वैयक्तिक पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.
६० किलो वजनी गटात चिंचघरचा भैरवनाथ क्रीडामंडळ उपविजेता, कुंभाडचा हनुमान क्रीडामंडळ क्रमांक, आंबवलीच्या झोलाई युवा प्रतिष्ठानला चतुर्थ क्रमांक मिळाला.
पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५५५५ रुपये ३३३३ रुपये व तृतीय व चतुर्थ क्रमांकास २२२२ रुपये व चषक देवून सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चढाई- विशाल चव्हाण, सर्वोत्कृष्ट पकड़- सिद्धेश शिंदे, सर्वोत्कृष्ट खेळाडू- ऋतिक शिंदे यांना वैयक्तिक पारितोषिके देवून गौरवण्यात आले.
स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून संतोष शिर्के, पंचप्रमुख शरद भोसले, विलास बेंद्रे, आशुतोष साळुंखे, उल्हास शेलार, दिनेश पदुमले यांनी काम पाहिले. तालुका कबड़ी असो. चे कार्याध्यक्ष महेश भोसले कार्यकारिणी सदस्य महेश मर्चेडे, सुर्वे यांनी खेळाडूचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका कबड़ी असो. चे अध्यक्ष सतिश चिकणे, सचिव रवींद्र बेकर, उपाध्यक्ष सुभाष आबेडे, आनंद हबीर, कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, सल्लागार दीपक यादव, दिलीप कारेकर, सुजित फागे, स्वप्निल सैतवडेकर, तेजा बैंकर संपदा गुजराथी यांच्यासह झोलाई क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक दीपक यादव व मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी प्रयत्न केले.










