अणसुर गावातील स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद

Google search engine
Google search engine

ग्रापंचायत अणसुर व बहर महीला ग्रामसंघ यांचा पुढाकार

वेंगुर्ले | प्रतिनिधी : अणसुर गावामध्ये ग्रापंचायत अणसुर व बहर महीला ग्रामसंघ, अणसुर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये गावातील महिलांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
अणसुर गावातील सर्व समुहातील महिलांनी गावातील रस्ते, शाळा परिसर, मंदिर परिसर, सार्वजनिक विहिरी यांची साफसफाई केली. यावेळी गावचे सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर तसेच मंगेश गावडे, संदेश गावडे, प्रभाकर गावडे, चिन्या गावडे बिट्टू गावडे, पूजक गावडे, प्रज्ञा प्रभाकर गावडे, सुधाकर गावडे, सीमा विलास गावडे या सह गावातील सर्व महिलानी हा सामाजिक उपक्रम राबविण्यास उस्फुर्त सहभाग घेतला व अभियानचे उदिष्ट पुर्ण केले. सर्व महिलांचे व ग्रामपंचायत अणसुर यांचे मोलाचे योगदान लाभले त्याबद्दल सर्वांचे सरपंच सत्यविजय गावडे यांनी आभार मानले आहेत.