खेड तालुक्याला पुन्हा ‘अवकाळी’ चा तडाखा !

 

शहरासह ग्रामीण भागात गारांचा वादळी पाऊस , झाडे उन्मळली

खेड(प्रतिनिधी) गेल्या तीन दिवसां पूर्वी कोसळलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेड शहरासह ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले वेगवान वारे व विजेच्या कडकडाटा सह अर्धा तास कोसळलेल्या पावसाने शहरात व ग्रामीण भागात ठीक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर गारा देखील कोसळल्या

१३ मे रोजी सांयकाळी च्या सुमारास तालुक्यात वादळी पाऊस झाला होता त्याचीच पुनरावृत्ती गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाली गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पाऊस झाला यामुळे दिवस भरात उष्म्याने कहरच केला होता यामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कड कडाटा सह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वांची तारांबळ उडाली

 

दरम्यान वेगवान वाऱ्यानी खेड शहरा सह ग्रामीण भागात ठीक ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही व्यापाऱ्यांच्या दुकानावर झाडे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही झाडे महावितरण च्या वाहिन्या वर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता ग्रामीण भागात आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानी ला सामोरं जावं लागलं सुमारे अर्धा तास कोसळले ल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले