संगमेश्वरातील गुणवंतांसोबत कलांगण तर्फे दिलखुलास गप्पा

माखजन |वार्ताहर

एस.एस.सी परिसक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यां समवेत कलांगण संस्थेतर्फे दिलखुलास गप्पा मारण्यात आल्या.

ज्यांनी परिश्रमांची पराकाष्ठा करत एस.एस.सी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले.अशा विद्यार्थ्यांच्या यशा मागच गुपित,ध्येय,त्यांच्या मागवून अशा परीक्षांना समोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कळावे,व संगमेश्वर सारख्या डोंगरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची खरी ‘संपदा’ सर्वदूर समजावी या हेतूने कलांगण ने ही सामुहील गप्पा गोष्टीसह मुलाखत घेतली.

कलांगण ही सांस्कृतील,सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणारी संगमेश्वर तालुक्यातील अग्रगण्य संस्था आहे.’संगमेश्वरातील संपदा’ सर्वश्रुत व्हावी यासाठी देखील ही संस्था काम करत असते. कलांगण तर्फे झालेल्या ह्या मुलाखतपर गप्पा गोष्टी कार्यक्रमात पार्थ ब्रीद १००% मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली, गुंजन खवळे ९९.२०%
अरुंधती पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल, देवरूख, पार्थ भागवत ९७% न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख,ऋग्वेद रेमणे ९५%
तु.ग.गांधी विद्यालय, कोंडगाव,वेदिका मोरे ९४.८०% माखजन इंग्लिश स्कूल, माखजन ,मनुश्री कडवईकर ९३.८०%,भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई आदी विदयार्थ्यांचा समावेश होता.

हा सगळंच संवाद सर्वदूर समजावा यासाठी कलांगण संगमेश्वर च्या यु ट्यूब चॅनेल वर प्रसारित केला जाणार आहे.सहा गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत कलांगण संस्थेचे व प्रख्यात निवेदक निबंध कानिटकर यांनी संवाद साधला.यावेळी यश कापडी,तेजस संसारे,सौ समता कोळवणकर आदी उपस्थित होते.