आ. योगेश कदमांकडून जगबुडी गणेश घाटाची पाहणी

खेड(प्रतिनिधी) खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन व विसर्जन कट्टा पथकाने पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत पूर्णपणे नियोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी जगबुडी नदी किनाऱ्यालगतचा गणेशघाट वे आपत्ती व्यवस्थापनाची पाहणी करत संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरातील जगबुडी नदीला येणाऱ्या पुराबाबत सतर्कतेसह आवश्यकत्या उपाययोजना राबवून पूरस्थितीत सावधानता बाळगण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

 

पूरस्थितीदरम्यान जगबुडी नदी किनारी व पूर परिस्थितीत परिसरात राहणाऱ्या नागरीकांची तातडीने स्थलांतर करण्याच्या दृष्टीने आवश्यकत्या उपाययोजना राबवण्याबाबतही आमदार योगेश कदम यांनी अधिकांऱ्यांना सूचना केल्या.

 

याप्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महेंद्र भोसले, माजी नगरसेवक मिनार चिखले, राजू बुटाला, सतिश चिकणे, सुनिल चव्हाण, मिलिंद काते, राजेंद्र चाळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेट यांच्यासह विसर्जन कट्टा पथक व नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी उपस्थित होते.