कचरा टाकून पलायन करणाऱ्या पूणेतील लोकप्रतिनिधीला पालिका प्रशासनाचा दणका

Google search engine
Google search engine

आंबोली चेकपोस्टवर अडवून केली दंडात्मक कारवाई

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात कचरा टाकून पलायन करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधीला सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चांगलाच दणका दिला. संबंधिताची गाडी आंबोली चेक पोस्ट येथे पकडून थेट पोलीस ठाण्यात दाखल केली यावेळी पोलिसांसमक्ष संबंधिताने अक्षरशः माफी मागितल्याने केवळ दंडात्मक कारवाई करून अखेर त्यांना सोडून देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती असे की गोवा येथे जीवाची मजा करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधी सह सहकार्याने शहरातील जिमखाना परिसरात आपल्याकडील कचरा फेकला यावेळी त्याठिकाणी असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले व कचरा टाकल्या प्रकरणी दंड भरावा लागेल अशी सूचना केली यावेळी आपल्या अविर्भावात संबंधित लोकप्रतिनिधीने माझे काय ते करून घ्या मी लोकप्रतिनिधी आहे असे अर्वाच्य भाषा वापरून आपली कार मार्गस्थ केली झालेला प्रकार संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याने नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांच्या कानी घातला श्री नाटेकर यांनी तात्काळ यासंदर्भात आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे चे कर्मचारी दत्ता देसाई यांना याबाबतची कल्पना दिली श्री देसाई यांनी संबंधित कार आंबोली चेक पोस्ट येथे पोहोचतात थांबवून त्या लोकप्रतिनीधीला पुन्हा सावंतवाडीत पोलीस स्टेशनला पाठवले. संबंधित लोकप्रतिनिधी आपल्या सहकार्यासमवेत सावंतवाडी पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर तेथे असलेल्या नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री नाटेकर व आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले झालेला प्रकार चुकीचा असून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हाच दाखल करू असा इशारा त्यांनी दिला यावेळी आपल्याकडून झालेल्या प्रकार चुकीचा आहे यापुढे असा प्रकार होणार नाही आपल्याला माफ करा अशी विनंतीच त्या लोकप्रतिनिधीने लावून धरली अखेर कचरा प्रकरणी दोन हजार रुपयांचा दंड भरून त्या संबंधितांना सोडण्यात आले.

दरम्यान, आरोग्य निरीक्षक नाटेकर म्हणाले सावंतवाडी शहरात अशाच प्रकारची कारवाई हाती घेण्यात आली असून कोणीही रस्त्यात कचरा टाकताना दिसून आल्यास थेट त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे शहरातील कचराकुंडीमध्ये कचरा टाकण्यात यावा. उघड्यावर कचरा टाकू नये शिवाय कारवाई करताना कुठल्याही लोकप्रतिनिधीने राजकीय हस्तक्षेप किंवा विनंती करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sindhudurg