राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी शमीत लाखे याची निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी शमीत लाखे याची निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. यापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमधून शमीत याची पूर्व राष्टीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली होती.

इंदोर येथे नुकतीच ९ वी वेस्ट झोन शूटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हि स्पर्धा १० मीटर पीप साईट प्रकारात घेण्यात आली.यात ५ राज्यांमधून ९३३ स्पर्धक सहभागी झाले होते. यात सावंतवाडीच्या आरपीडी प्रशालेचा विद्यार्थी शमीत श्याम लाखे याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत युथ गटात सहभाग घेऊन ४०० पैकी ३७३ गुणांची नोंद करत राष्ट्रीय स्पर्धे साठी आपले स्थान पक्के केले.

शमीत हा सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग रेंज वर नेमबाजीचा सराव करत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर याचे प्रशिक्षण लाभले तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले .सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शमीतचे विशेष कौतुक केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.

Sindhudurg