जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची जामगे सैनिकी स्कूलला भेट

 

खेड(प्रतिनिधी) शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिकी स्कूलला जिल्हा क्रीडा अधिकारी विनय शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. शालेय परिसर, खेळाचे प्रांगण, खेळाचे साहित्य व प्रशालेत खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती घेतली.

प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत खेळांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक करत संवादही साधला. विविध खेळांबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती देत खेळांच्या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होण्याचा सल्लाही दिला याप्रसंगी संस्था खजिनदार काशिराम सकपाळ, प्राचार्य डॉ. एम. एस. खोत कमांडंट श्रीक्रिशन आदी उपस्थित होते.