हळबे महाविद्यालयात साठे  जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी 

दोडामार्ग | प्रतिनिधी : य लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती, तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी दोन्ही मान्यवरांच्या प्रतिमेष पुष्पहार अर्पण केले.

 

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील टिळकांचे कार्य.त्यांचे राजकारण, समाजकारन. साहित्य, याची माहिती दिली. याबरोबरकच.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संपदेचा धावता आढावा घेऊन गावकुसाबाहेर जन्मलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीने आपल्या अलौकीक  प्रतिभेच्या जोरावर सामान्य माणसाच्या जगण्याचे  प्रश्न मांडले. त्यामुळे या दोन्ही महात्म्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे  प्रतिपादन केले.           सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी.डी गाथाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. संजय खडपकर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व प्राद्यापक  कर्मच्यारी उपस्थित होते.