रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु बाळणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई श्ाुक्रवार 21 एप्रिल रोजी करण्यात आली.
संतोष दाजी धामणे (51,रा.जाकादेवी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शुक्रवारी ग्रामीण पोलिसाना जाकादेवी येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीच्या दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.त्याआधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता पोलिसांना खालगाव येथील जंगलमय भागात संतोष 250 रुपयांची 10 लिटर गावठी दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगून असलेला मिळून आला.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कायदा 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










